नवी दिल्ली : पहलगाममधील नरसंहारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत गृहमंत्री शहा यांच्या हातात लाल रंगाच्या दोन फाईल होत्या. या फाईलमध्ये नेमके काय होते? राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली का? हे प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रपती भवनात ही बैठक पार पडली. भारतान पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. या निर्णयांची राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली, असे समजते. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज (शुक्रवारी) पहलमागला भेट देताना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Fans
Followers